सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









सहशालेय कार्यक्रम



विसापूरच्या स्काऊटस् यांनी स्वच्छतेसाठी काढली जनजागृती व पर्यावरण सायकल रॅली
विसापूर (दि.१७ ऑगस्ट) – येथील रयत शिक्षण संस्थेचे,राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरमधील ४० स्काऊटस् यांनी सुट्टीच्या दिवशी एक सामाजिक बांधिलकी व देशप्रेमातून घोषणाफलक सायकलीस लावून विसापूर - पेड - विसापूर अशी ३७ की.मी.अंतर सायकलवरून जात विसापूर,हातनूर व पेड येथे गावात जाऊन घोषणा देत स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणाचे रक्षण, सायकलमुळे प्रदूषणापासून सुटका,सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व,सायकलचे व्यायामातील मह्त्व पटवून देण्यासाठी घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडत हा चिमुकला प्रयत्न केला.तसेच देशाची पर्यटन स्थळे सुरक्षित व स्वच्छ राहावेत यासाठी पेड येथील पर्यटन स्थळ येथे श्रमदानातून बगीचा व परिसराची स्वच्छता केली. श्रमदानासाठी लागणारे साहित्य पर्यटन स्थळवरील कर्मचारी वर्गाने उपलब्ध करून दिले. बगीचा तसेच लोखंडी पुलावर अस्थाव्यस्त पडलेली लाकडे मुलांनी व्यवस्थित रचून ठेवली. निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आस्वाद घेत पुन्हा विद्यार्थी परतीच्या मार्गाने विसापूरच्या दिशेने सायकलवर निघाले.या स्वच्छता रॅलीसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व सेवकवृंद यांनी मार्गदर्शन केले.
स्काऊटस्नी स्वच्छतेसाठी काढलेल्या सायकल रॅलीचे विसापूर,हातनूर व पेडच्या ग्रामस्थांनी कौतुक केले.या रॅलीचे नियोजन स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे, श्री.गणेश एस.जगदाळे श्री.वळवी यु.एल.यांनी केले.




























 





माने-पाटील विद्यामंदिरचे श्रमदान शिबीर व श्रावणी सहल उत्साहात संपन्न !
विसापूर (११ ऑगस्ट ) - येथील राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिरचे श्रमदान शिबीर व श्रावणी सहल सामाजिक वनीकरण (Forest) विसापूर येथे संपन्न झाले.
सकाळी लवकरच विद्यालयातून निघाले. वनीकरण (Forest)येथे पोहोचल्यानंतर इ.८ वी व ९ वी च्या स्काऊट-गाईड यांनी पावसाचे पडलेले पाणी अडवले जावे यासाठी उतारावर चर-खोदाई केली.पर्यावरणाच्या संवर्धनाचा एक उपाय करण्याचा प्रयत्न या चिमुकल्यांनी केला.सर्वच स्काऊट-गाईड यांनी उत्साहाने श्रमदान शिबीर पार पडले.
त्यानंतर सर्व विद्यार्थी आनंदाने वनीकरणात बागडत पळत होते.त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.मुलीही पारंपारिक खेळात रममाण झाल्या होत्या.
दमल्यानंतर सर्वच विद्यार्थी व शिक्षक जेवण करण्यास बसले व वनभोजनाचा आनंद घेतला. जेवणानंतर विद्यार्थ्यांनी गाणी,कोडी,विनोद,चुटके नाटिका सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमास चांगली साद देत कार्यक्रम पार पडला.
दुपारी सर्व विद्यार्थी विद्यालयात पोहचले.सर्वांच्या चेहऱ्यावर अलोट आनंद दिसून येत होता.या आनंदाला साद म्हणून विद्यार्थ्यांनी घरी जाताना ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेले एक-एक झाड घरी घेऊन गेले व दिलेले झाडाचे रोपण करून संवर्धन करण्याचे ठरविले.या श्रावणी सहल व श्रमदान शिबिराचे नियोजन हरित सेना प्रमुख श्री.पाटील एच.जी. व स्काऊट मास्टर श्री. विकास जी. लोखंडे तसेच सर्व सेवकवृंद यांनी केले.































विसापुरातून जवानांना पाठविल्या तीनशे राख्या !
विसापुराच्या स्काऊट गाईडच्या ३०० राख्या सीमेवरील जवानांसाठी पोस्टाने रवाना ...😀
विसापूरचे पोस्टमन श्री.अनंत कनिरे यांचेकडे राख्याची पाकिटे देताना मा.श्री.बळवंत (तात्या)चव्हाण(स्कूल कमिटी सदस्य) ,श्री.मुरलीधर (आप्पा)माने (अध्यक्ष आजी-माजी सैनिक संघटना), प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व इयत्ता आठवीचे स्काऊट गाईड




विसापूर ( २३ जुलै)-'भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, म्हणून चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त विसापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे,राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरच्या चिमुकल्या स्काऊट-गाईड बहिणींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर बंधू तुझे सलाम’, ‘धागा बंधन का, राखी बहन कीअसे अनोखे संदेशही पाठविण्यात आले आहेत.देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करण्यात सैनिक बांधवांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कधीही सणासुदीचा आनंद घेता येत नसतो. या राखीपौर्णिमेला या छोट्याशा गावातील बहिणींनी सीमेवरील बांधवांसाठी आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे ३०० राख्या नुकत्याच पाठविण्यात आल्या. त्यांना प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व शिक्षक यांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभले.
           या उपक्रमामुळे जवानांचे मनोधैर्य नक्कीच उंचावेल. राष्ट्रीय भावनेतून हा कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांच्यामध्ये जवानांच्या आत्मियता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांतून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक तयार होतील.‘‘ बहीणींच्या या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सिमेवर लढताना प्रेरणा मिळणार असल्याच्या भावना विद्यार्थिनी व्यक्त करतात.
          भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सीमेवरील या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या विसापूरच्या बहिणींनी ३००हून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमचे नियोजन स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे यांनी केले आहे.







'यू-१७ फीफा वर्ल्ड कप फुटबॉल टूर्नामेंट इन ऑक्टोंबर २०१७'
विसापूर- भारताने 'यू-१७ फीफा वर्ल्ड कप फुटबॉल टूर्नामेंट इन ऑक्टोंबर २०१७' चे यजमानपद स्वीकारले आहे.ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक फुटबॉल महासंघाची फीफा वर्ल्ड कप स्पर्धा १७ वर्षाखालील मुले या गटात दि. ६ ते २४ ऑक्टोंबर २०१७ दरम्यान होत आहे.या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आणि राज्यातील मुले-मुलीमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी 'महाराष्ट्र मिशन एक मिलियन ' हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
यासाठी आतापासूनच विसापूर येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये मुला-मुलींना जास्तीत जास्त फुटबॉल खेळून प्रोत्साहन देण्याचे ठरविलेले आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने खेळ खेळताना दिसत आहे.






 माने-पाटील विद्यामंदिरमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी !!!
विसापूर-आज येथील राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान(कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवंदना करण्यासाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी विद्यालयातील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना म्हणून गुरुवर्यांना श्रीफळ,पेन,गुलाबपुष्प व एक रोपटे दिले.यावेळी गुरुंबद्दल असलेला आदर कु.पूर्वा पाटील,कु.श्रुती माने,कु.धनश्री माने, कु.तेजस्विनी सुतार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री.खोत सी.डी. व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा बद्दल मार्गदर्शन केले.यावेळी सूत्रसंचालन कु.तनुश्री माने व आभार प्रदर्शन सुमित माने याने केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या सौ.जगदाळे आर.जी. व सौ.ज्योत्स्ना विकास लोखंडे यांनी केले.




























२१ जून -अंतरराष्ट्रीय योग दिन :- 









💐💐💐💐💐💐💐💐
*भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.भीमराव रामजी आम्बेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमीत्त
 राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर विसापूर येथे प्रतिमा पूजनीय करताना शिक्षक वृंद
💐💐💐💐💐💐💐💐💐



* महात्मा फुले यांची १९० वी जयंती उत्साहात साजरी :
*सामाजिक क्रांतीचे अग्रदूत अब्जावधीच्या हदयावर अधिराज्य गाजवनारे सत्यशोधकाचा पहिला क्रांतीचा झेंडा फडकाणारे सुर्याचे प्रति सुर्य क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १९० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐




No comments:

Post a Comment