सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









शालेय प्रार्थना

१. राष्ट्रगीत
जन गन मन अधिनायक जय हे

भारत भाग्य विधाता

पंजाब सिंध गुजरात मराठा

द्राविड उत्कल वंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा

उच्छल जलधि तरंग

तव शुभ नामे जागे

तव शुभ आशिश मागे

गाये तव जय गाथा

जन गन मंगलदायक जय हे

भारत भाग्य विधाता

जय हे जय हे जय हे

जय जय जय जय हे॥ 


२. संविधान : 
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम ,
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा 
व त्याच्या प्रत्येक नागरिकांस:
         सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय,
         विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
         व उपासना यांचे स्वात्यंत्र;
         दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 
         व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 
         यांचे आश्वासन देणारी बंधुता 
         प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत 
          आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
          याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित 
          करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.

३. प्रतिज्ञा 
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

 पसायदान :

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
तेथे म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥
दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्याची बुद्धी होवो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥
पापी लोकांचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरुपी सूर्याचा उद्य होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥
सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥
जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारुपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहे. ॥ ५ ॥
जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥
तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परीपूर्ण होऊन अखंडीतपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥
हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥
यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥



रयत गीत :



 रयत माऊली गीत :

सरस्वती वंदन :

मनाचे श्लोक :

स्काऊट प्रार्थना :

No comments:

Post a Comment