सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









स्काऊट-गाईड























दैनिक तरूण-भारत चे पत्रकार मा.श्री.संजय पाटील (हातनूर)यांचे मनपूर्वक आभार !!
🙏🙏


विसापुरातून जवानांना पाठविल्या तीनशे राख्या !
विसापुराच्या स्काऊट गाईडच्या ३०० राख्या सीमेवरील जवानांसाठी पोस्टाने रवाना ...😀
विसापूरचे पोस्टमन श्री.अनंत कनिरे यांचेकडे राख्याची पाकिटे देताना मा.श्री.बळवंत (तात्या)चव्हाण(स्कूल कमिटी सदस्य) ,श्री.मुरलीधर (आप्पा)माने (अध्यक्ष आजी-माजी सैनिक संघटना), प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व इयत्ता आठवीचे स्काऊट गाईड



विसापूर ( २३ जुलै)-'भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, म्हणून चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त विसापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे,राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरच्या चिमुकल्या स्काऊट-गाईड बहिणींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर बंधू तुझे सलाम’, ‘धागा बंधन का, राखी बहन कीअसे अनोखे संदेशही पाठविण्यात आले आहेत.देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करण्यात सैनिक बांधवांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कधीही सणासुदीचा आनंद घेता येत नसतो. या राखीपौर्णिमेला या छोट्याशा गावातील बहिणींनी सीमेवरील बांधवांसाठी आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे ३०० राख्या नुकत्याच पाठविण्यात आल्या. त्यांना प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व शिक्षक यांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभले.
           या उपक्रमामुळे जवानांचे मनोधैर्य नक्कीच उंचावेल. राष्ट्रीय भावनेतून हा कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांच्यामध्ये जवानांच्या आत्मियता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांतून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक तयार होतील.‘‘ बहीणींच्या या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सिमेवर लढताना प्रेरणा मिळणार असल्याच्या भावना विद्यार्थिनी व्यक्त करतात.
          भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सीमेवरील या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या विसापूरच्या बहिणींनी ३००हून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमचे नियोजन स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे यांनी केले आहे.







'यू-१७ फीफा वर्ल्ड कप फुटबॉल टूर्नामेंट इन ऑक्टोंबर २०१७'
विसापूर- भारताने 'यू-१७ फीफा वर्ल्ड कप फुटबॉल टूर्नामेंट इन ऑक्टोंबर २०१७' चे यजमानपद स्वीकारले आहे.ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक फुटबॉल महासंघाची फीफा वर्ल्ड कप स्पर्धा १७ वर्षाखालील मुले या गटात दि. ६ ते २४ ऑक्टोंबर २०१७ दरम्यान होत आहे.या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आणि राज्यातील मुले-मुलीमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी 'महाराष्ट्र मिशन एक मिलियन ' हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
यासाठी आतापासूनच विसापूर येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये मुला-मुलींना जास्तीत जास्त फुटबॉल खेळून प्रोत्साहन देण्याचे ठरविलेले आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने खेळ खेळताना दिसत आहे.



 


विद्यार्थ्यासाठी व पालकांसाठी सूचना : 
सन-२०१७ - १८  या शैक्षणिक वर्षात स्काऊट-गाईड पथकांची नोंदणी करावयाची आहे.तरी सर्व पालकांनी नोंदणी शुल्क रु.१५ /- विभाग प्रमुखांकडे जमा करावेत.




१ जुलै २०१७ - ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम :
विसापूरच्या स्काऊट-गाईड यांचे वृक्षारोपण उत्साहात संपन्न !
विसापूर-आज येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजच्या परिसरात स्काऊट-गाईड यांनी ६५ विविध प्रकारची रोपटे लावून वृक्षारोपण सप्ताहास सुरुवात केली. सकाळीच स्काऊट-गाईड यांनी ढोल-ताशाच्या गजरात व विविध रोपटे यांची प्रभात फेरी काढून वृक्षारोपणाची जागृती केली. या फेरीत जि.प.सदस्य श्री.अर्जुन(बापू)पाटील हेही सहभागी झाले होते.विद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमात सरपंच सौ.मंगल माने, जि.प.सदस्य श्री.अर्जुन (बापू) पाटील, मा.जि.प.सदस्य श्री.सुनिल (भाऊ) पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दिपक अमृतसागर,बळवंत चव्हाण,संदीप पाटील (पोलीस पाटील), शरद डबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.विद्यालयाचे प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.,पर्यवेक्षिका सौ.अलका माने यांनीही वृक्षारोपण केले.या वृक्षारोपणाचे नियोजन श्री.पाटील एच.जी.व स्काऊट मास्टर श्री.विकास लोखंडे व सर्व शिक्षक – शिक्षकेतर सेवक यांनी केले.








































 

No comments:

Post a Comment