ज्ञानाची गंगा दीन दुबळ्या-वंचितांच्या दारापर्यंत, सामान्य जणांपर्यंत पोहचवून ज्ञान तीर्थाचा लाभ त्यांना मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे शिक्षणमहर्षी व शिक्षणाचे आधुनिक भगीरथ,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक - पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा यांच्या प्रती विनम्र अभिवादन !
इवलेसे रोप लाविले सातारच्या दारी –
तयाच्या वेलू येवूनी पोहचला विसापूरनगरी !!
जून १९५७ रोजी राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील यांनी स्वतःचा राहता वाडा देऊन विद्यालयाची स्थापना झाली. तसेच ५२ एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला देणगी स्वरुपात दिली. आज विद्यालयाकडे प्रचंड मोठी इमारत आहे.
सुरुवातीला ३१ विद्यार्थी संख्येवर सुरु झालेल्या या विद्यालयात आज रोजी ज्युनिअर कॉलेजसह ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सन २००६ मध्ये विद्यालयात इयत्ता ८ वी ची तुकडी सेमी इंग्लिश माध्यमाची करण्यात आली व आज विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी अखेर सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु आहेत.
विद्यालयात सन २००८ पासून कृषि विज्ञान ज्युनिअर कॉलेज सुरु करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०१३-१४ साली कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत इयत्ता ५ वी व ८ वी साठी सुरु करण्यात आलेला रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प आज इ.५ वी ते १० वी व वर्गांना राबवीत आहोत. विद्यालयातील एकूण ३७१ विद्यार्थी प्रकल्पात आहेत
विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यालय भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. मुला-मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृहे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात बांधणे आवश्यक असल्याने बांधकाम प्रगतीपथावर चालू आहे.या बांधकामासाठी रुपये ९ लाख खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी रुपये ४.५ लाख विसापूर गावचे सुपुत्र व Modern College वाशीचे प्राचार्य श्री.विठ्ठल सुबराव शिवणकर यांनी दिले आहेत.विद्यालय त्याचे ऋणी आहे.
शालेय पोषण आहार स्वयंपाकगृहासाठी रुपये ४.५० लाख खर्च करूं आज कामकाज पूर्ण करूं स्वयंपाकगृह कार्यरत आहे.
विद्यार्थ्यांना अध्ययनात सुलभता यावी यासाठी विद्यालयातील ६ गुरुकुल वर्गात LCD प्रोजेक्टर कार्यरत आहे. यावर विद्यार्थ्यांना रुपये ९० हजार किंमतीचे इसेन्स व चाणक्य सॉफ्टवेअर वापरून अध्यापन केले जाते. तसेच सर्व गुरुकुल वर्गात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. Sky-pe च्या आधारे विद्यार्थी वर्गात बसून प्राचार्य व पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क करतात.
गुरुकुलच्या माध्यमातून विविध स्पर्धा, बाह्यतज्ज्ञ मार्गदर्शन, क्षेत्रभेट, विपुल ग्रंथ संपदा व संदर्भ ग्रंथ वाचन, विविध तज्ज्ञांच्या कॅसेटस, विविध software पी. पी. टी. द्वारे अध्यापन, चाचण्या या माध्यमातून विद्यालय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
खडू व फळा विरहीत अध्यापन पद्धती करणेसाठी ‘डिजिटल स्कूल’ कडे विद्यालयाची वाटचाल मोठ्या वेगाने सुरु आहे.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक सतत प्रयत्नशील व धडपडत असतात. S.S.C.मार्च २०१६चा निकाल ९५.१२% आहे व H.S.C फेब्रुवारी २०१६ चा निकाल ९७.३०% आहे. खालील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले –
एस.एस.सी. - १.कु.समिक्षा बाळासाहेब जाधव – ९४ .००%(केंद्रात प्रथम)
१.कु.प्रज्ञा प्रदिप पोतदार – ९४.००%
२.कु.मयुरी पोपट माळी – ९१ .२०%
३. कु.सोनम तानाजी सुतार – ९०.८०%
तसेच २९ विद्यार्थी ८० % पेक्षा जास्त गुण मिळविलेले होते.
एच.एस.सी. – १.कु.अक्षयकुमार परशुराम पाखरे – ७०.००%
२.कु.दिपाली चंद्रकांत माने – ६६.७७%
३.कु.पल्लवी एकनाथ माळी – ६२.६२%
विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे, बाह्य परीक्षांचे आयोजन केले जाते.
एन.एम.एम.एस. परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी कु.तेजश्री शशिकांत पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विद्यालयातील सावंत प्रफुल्ल भारत याची निवड झाली आहे.
कु.साक्षी उमेश भागवत या विद्यार्थिनीचा गीता पाठांतर स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे.
विद्यालयाचा क्रीडा विभागही विद्यालयाची मान उंचावत आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कबड्डी मुली -१४ वर्षा खालील मुली व १७ वर्षाखालील मुली स्पर्धेत क्रिडा शिक्षक श्री.खाडे एस.डी.व श्री.शिंदे के.डी. सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या दोन्ही संघांची निवड झाली. तासगाव येथे होत असलेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यालयातील ६६ खेळाडू सहभागी झाले आहेत.
विद्यालयातील सर्वच शिक्षक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत असतात.
भारत स्काऊट-गाईड नवी दिल्ली यांचे वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी विद्यालयातील स्काऊट मास्टर श्री. विकास जी. लोखंडे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण केंद्र भोर(पुणे) येथे एच.डब्ल्यू.बी. (हिमालय वूड बज ) पूर्ण करून त्यांची सांगली स्काऊट गाईड संस्थेवर समादेशक म्हणून निवड झालेली आहे.
स्काऊट गाईड हे तर आमचे विद्यालयाचा मुकुटमणीच आहे. विद्यालयातील स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली २०१३ पासून ४० स्काऊटची महाराष्ट्र राज्य स्काऊट पुरस्कारासाठी निवड झालेली आहे,त्यापैकी सांगलीचे नेतृत्व म्हणून विद्यालयाचे ८ स्काऊट यांच्या स्काऊट राज्य पुरस्काराचे वितरण व गौरव समारंभ दि.२२ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री. सी. विद्यासागर राव यांचे हस्ते राज्यपाल भवन, मुंबई येथे होणार होता परंतु त्या दिवशी एस.एस.सी.चा पेपर असल्याने विद्यार्थ्यांना जाता आले नाही. याच ८ स्काऊटची राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांची परीक्षा भारत स्काऊट आणि गाईड नवी दिल्ली यांचे वतीने महाराष्ट्र स्काऊट राज्य प्रशिक्षण केंद्र,रामबाग,भोर (पुणे)दि.२१ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पार पडले.यामध्ये विद्यार्थ्यांना नैपुण्य प्राप्त होऊन सदर स्काऊटचा सत्कार विद्यमान राष्ट्रपती यांचे हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे होणार आहे.या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील ८ स्काऊट महाराष्ट्र राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी दि.१२ जानेवारी ते १५ जानेवारी २०१७ या कालावधीत महाराष्ट्र राज्य स्काऊट प्रशिक्षण शिबीर सोनतळी, कोल्हापूर येथे जात आहेत.
या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील इयत्ता ८ वी च्या स्काऊट गाईड पथकाने पंतप्रधान ढाल स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला आहे. जर या स्पर्धेत पथकाला प्राविण्य व नैपुण्य मिळाल्यास पथकाचा भारताचे मा.पंतप्रधान यांचे हस्ते लाल किल्ला नवी दिल्ली येथे सन्मान होत असतो.
एक सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम या हेतूने नेपाळ-बिहार आपत्ती निवारण निधी म्हणून विद्यालयाच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून रुपये ४०७२/- निधी सांगली भारत स्काऊट गाईड कार्यालय सांगलीकडे जमा केले.
२७ डिसेंबर २०१६ ते ०५ जानेवारी २०१७ मध्ये म्हैसूर (कर्नाटक) येथे होणाऱ्या १७ व्या राष्ट्रीय मेळावा जाम्बोरीसाठी राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यालयातील ८ स्काऊट स्काऊट मास्टर श्री.विकास लोखंडे यांची निवड झालेली होती त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व जांबोरी अवार्ड मिळवून शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर निर्माण केले आहे.
२०१६-१७ झालेल्या खरीकमाई सेवा महोत्सवात स्काऊट गाईड यांनी रुपये ३००००/- कमाई केली. यावर्षी झालेल्या खरी कमाई मध्ये विद्यार्थ्यांनी रुपये ३५०००/- ची उलाढाल करून रुपये २२३१४/- निव्वळ नफा मिळविला आहे.
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी सांगली जिल्हा पोलीस परेड मैदान, सांगली या ठिकाणी विद्यालयाचे ७० स्काऊट-गाईड पथक पोलिसदलाबरोबर संचालनात सहभागी होत असतात.
दि.१ ते ४ फेब्रुवारी २०१७ या कावधीत विद्यालयाचा ५ वा त्रीदिवसीय स्काऊट-गाईड निवासी निसर्गनिवास शिबीर गोटेवाडी येथे आयोजित केलेला आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी श्री.पाटील एच.जी.यांनी शतकोटी वृक्ष प्रकल्प व हरित सेना या प्रकल्पांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात आंबा व चिक्कू २०० झाडे विद्यालयाच्या शेतात व विद्यालयाच्या परिसरात लावण्यात आली असून त्यांचे संगोपन चालू आहे. तसेच भूजल पातळी वाढावी यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरावे, यासाठी विद्यालयातील स्काऊट गाईड यांनी चरखोदाईचे काम करत आहेत.
विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सोयी आपण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तसेच ज्युनिअर कॉलेजसाठी स्वतंत्र वर्गखोल्या बांधणे गरजेचे असल्याने अंदाजे रक्कम रुपये १५ लाख निधी उपलब्ध असून बांधकाम सुरु करत आहोत. त्यासाठी एकूण रुपये ४५ लाख अपेक्षित आहे.
विद्यालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक सभागृहाची आवश्यकता आहे.
संरक्षण भिंतीचे प्लास्टर करणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्युनिअर कॉलेज साठी स्वतंत्र आय.सी.टी.लब बांधणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी जुनी शाळा भरत होती, त्या ठिकाणी एक भव्य सभागृह बांधून दरवर्षी अंदाजे ४ ते ५ लाख वार्षिक उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीने वाटचाल सुरु आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, विविध संस्था, परीसरातील मान्यवर, पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यातून व समन्वयातून विद्यालय प्रगतीची उत्तुंग गरुड भरारी घेत आहे.ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाबरोबरच समाज शिक्षणाचे केंद्रस्थान व्हावे याच ध्येयाने आम्हां सर्वांची वाटचाल चालू आहे.
विद्यालयाच्या या वाटचालीसाठी आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आपले प्रेमळ सहकार्य सतत लाभावे हीच नम्र विनंती.
धन्यवाद ! जय कर्मवीर !

No comments:
Post a Comment