* दररोज किमान
दहा मिनिटे इंग्रजी बातम्या ऐकाव्यात .
*दररोज किमान दहा मिनिटे इंग्रजी
वर्तमानपत्र वाचावे .
*जास्तीत जास्त
शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा .
* वर्षातून किमान पाच वाचनीय पुस्तकांचे वाचन
करावे .
* किमान एकातरी
छंदाची जोपासना करावी.
* भाषा विषयात घेतल्या जाणाऱ्या निबंध व
वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यावा .
* प्रत्येक
महत्त्वाच्या परीक्षेनंतर तपासलेल्या उत्तरपत्रिका प्राप्त होताच गुणांचे
विश्लेषण,पृथ:करण करून कमकुवत भागाच्या नोंदी कराव्यात .त्या भागामध्ये प्रगती
होण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करावेत. पालकांना उत्तरपत्रिका दाखवाव्यात
* विज्ञानातील प्रयोगांचे अध्ययन करत असतांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःप्रयोग करून पाहावा.स्वतः उपकरणे हाताळावीत .
* शक्य झाल्यास इंटरनेटचा वापर करून आपल्या विषयातील सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा.
* वर्षातून किमान एकतरी शास्त्रीय उपकरण तयार करावा .
* कर्मवीर विद्याप्रबोधिनीकडून पुरवण्यात आलेल्या विविध सी.डी.व डी.व्ही.डी.वेळोवेळी पाहून आपल्या ज्ञानात भर घालावी.
* स्वनिर्मित साहित्य तयार करून शब्दगंधमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा.
* निरोगी राहण्याच्या दृष्टीने खालील आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे.
* संतुलित व पुरेसा आहार घेणे.ठराविक वेळी जेवण घेणे.
*ठराविक वेळी ६ ते ७ तासांची झोप घेणे.
* रोज किमान अर्धा तास खेळणे/व्यायाम,योगासने करणे ,सूर्यनमस्कार घालणे.
* शारीरिक स्वच्छता ठेवणे.
*स्वतः.चे दैनंदिन वेळापत्रक (सुट्टीच्या दिवसासह)तयार करणे व त्याचे पालन करणे.
No comments:
Post a Comment