खुशखबर ! खुशखबर !! खुशखबर !!!
www.manepatilvidyamandir.blogspot.com
कळविण्यात अतिशय आनंद वाटतो की, आपल्या राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान ( कृषि ) ज्युनिअर कॉलेज विसापूर शाळेने नव्याने Blog ( mini webside) चालु केलेला आहे. तो आजपासून आपल्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
या Blog मुळे आपणास शाळेतील सर्व उपक्रम, विद्यालयाची वैशिष्ट्ये,विद्यालयाचा इतिहास,रयत गुरुकुल प्रकल्प,शाळेमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, विद्यालयाचे स्पर्धेतील यश, विद्यालयाचे प्रकल्प ,विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती ,विद्यार्थ्यासाठी सूचना,पालकांसाठी सूचना, शालेय प्रार्थना, विविध कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ, विद्यार्थ्याचा निकाल हे सर्व एका क्लिकवर नियमितपणे पाहण्यास उपलब्ध होणार आहे.
तसेच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज Online भरण्यास आपण सुरुवात करत आहोत.. जगाच्या तंत्रज्ञानाबरोबर आपणही चालावे त्यासाठी डिजिटल भारत यासाठी एक विद्यालयाचा प्रयत्न आहे.
त्यासाठी www.manepatilvidyamandir.blogspot.com या लिंकवर क्लिक करूंन आपण Blog ला भेट द्यावी व विद्यालायाचे वैशिष्ट्ये व् उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक ,शिक्षक गावकरी यांचेपर्यंत पोहचविणेसाठी विद्यालयास सहकार्य करावे.
भेट दिल्यानंतर Blog विषयी आपले मत नोंदवावे तसेच Blog तयार करताना काही त्रुटीही झालेल्या असतील त्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपल्या कमेंट पाठवून सहकार्य करावे.
विद्यालयाच्या उत्तुंग भरारीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी आत्ताच भेट द्या...
www.manepatilvidyamandir.blogspot.com
No comments:
Post a Comment