विसापुरातून जवानांना
पाठविल्या तीनशे राख्या !
विसापुराच्या स्काऊट गाईडच्या ३०० राख्या सीमेवरील जवानांसाठी पोस्टाने रवाना ...
😀
विसापूरचे पोस्टमन श्री.अनंत कनिरे यांचेकडे राख्याची पाकिटे देताना मा.श्री.बळवंत (तात्या)चव्हाण(स्कूल कमिटी सदस्य) ,श्री.मुरलीधर (आप्पा)माने (अध्यक्ष आजी-माजी सैनिक संघटना), प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व इयत्ता आठवीचे स्काऊट गाईड
विसापूरचे पोस्टमन श्री.अनंत कनिरे यांचेकडे राख्याची पाकिटे देताना मा.श्री.बळवंत (तात्या)चव्हाण(स्कूल कमिटी सदस्य) ,श्री.मुरलीधर (आप्पा)माने (अध्यक्ष आजी-माजी सैनिक संघटना), प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व इयत्ता आठवीचे स्काऊट गाईड
विसापूर
( २३ जुलै)-'भारतीय सण हे नाती दृढ
करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे.
समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव
साजरा करता यावा, म्हणून
चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त विसापूर येथील रयत शिक्षण
संस्थेचे,राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरच्या चिमुकल्या
स्काऊट-गाईड बहिणींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या
पैशातून राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर ‘बंधू तुझे सलाम’, ‘धागा बंधन का, राखी बहन की’ असे अनोखे संदेशही पाठविण्यात आले आहेत.देशाच्या सीमेवर
अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करण्यात सैनिक बांधवांचे मोलाचे
योगदान आहे. त्यांना कधीही सणासुदीचा आनंद घेता येत नसतो. या राखीपौर्णिमेला या
छोट्याशा गावातील बहिणींनी सीमेवरील बांधवांसाठी आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे ३००
राख्या नुकत्याच पाठविण्यात आल्या. त्यांना प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व
शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामुळे जवानांचे मनोधैर्य नक्कीच
उंचावेल. राष्ट्रीय भावनेतून हा कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांच्यामध्ये
जवानांच्या आत्मियता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांतून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक
तयार होतील.‘‘ बहीणींच्या या
राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सिमेवर लढताना प्रेरणा
मिळणार असल्याच्या भावना विद्यार्थिनी व्यक्त करतात.
भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण
करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक
नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सीमेवरील या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या
विसापूरच्या बहिणींनी ३००हून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमचे नियोजन स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment