विसापूरमध्ये ‘मिशन इंद्रधनुष’चा कार्यक्रम क्र.२ – महादेव मंदिरात संपन्न !
विसापूर (दि.१९ सप्टेंबर २०१७ ) येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरच्या स्काऊटस् आणि गाईडस् यांनी ‘मिशन इंद्रधनुष : जिंदगी इंद्रधनुष बनाए’ या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा महादेव मंदिराच्या सभागृहात सायं.७ वा संपन्न झाला.यावेळी परिसरातील ५०-६० माता-बालक-पालक हजर होते.इ.९ वी च्या स्काऊटस् आणि गाईडस् यांनी ७ आजारांची माहिती सांगून उपाययोजना सांगितली.तसेच स्काऊटस् यांनी नाटिका सादर करून आरोग्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या शेवटी मा.श्री.शरद डबे सर,मा.श्री.लक्ष्मण माने, सौ. अनिता माने यांनी मुलांचे कौतुक करून आरोग्याचे नियम पाळण्याची शपथ घेतली.
No comments:
Post a Comment