विसापूरच्या स्काऊटस् यांनी स्वच्छतेसाठी काढली जनजागृती व पर्यावरण सायकल रॅली
विसापूर (दि.१७ ऑगस्ट) – येथील रयत शिक्षण संस्थेचे,राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरमधील ४० स्काऊटस् यांनी सुट्टीच्या दिवशी एक सामाजिक बांधिलकी व देशप्रेमातून घोषणाफलक सायकलीस लावून विसापूर - पेड - विसापूर अशी ३७ की.मी.अंतर सायकलवरून जात विसापूर,हातनूर व पेड येथे गावात जाऊन घोषणा देत स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणाचे रक्षण, सायकलमुळे प्रदूषणापासून सुटका,सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व,सायकलचे व्यायामातील मह्त्व पटवून देण्यासाठी घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडत हा चिमुकला प्रयत्न केला.तसेच देशाची पर्यटन स्थळे सुरक्षित व स्वच्छ राहावेत यासाठी पेड येथील पर्यटन स्थळ येथे श्रमदानातून बगीचा व परिसराची स्वच्छता केली. श्रमदानासाठी लागणारे साहित्य पर्यटन स्थळवरील कर्मचारी वर्गाने उपलब्ध करून दिले. बगीचा तसेच लोखंडी पुलावर अस्थाव्यस्त पडलेली लाकडे मुलांनी व्यवस्थित रचून ठेवली. निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आस्वाद घेत पुन्हा विद्यार्थी परतीच्या मार्गाने विसापूरच्या दिशेने सायकलवर निघाले.या स्वच्छता रॅलीसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व सेवकवृंद यांनी मार्गदर्शन केले.
स्काऊटस्नी स्वच्छतेसाठी काढलेल्या सायकल रॅलीचे विसापूर,हातनूर व पेडच्या ग्रामस्थांनी कौतुक केले.या रॅलीचे नियोजन स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे, श्री.गणेश एस.जगदाळे श्री.वळवी यु.एल.यांनी केले.

No comments:
Post a Comment