विसापुरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा !
विसापूर (१५ ऑगस्ट) : येथील रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरमध्ये ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत शपथ घेऊन घर ते देश सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरवले.त्यानंतर विद्यालयातील ४०० स्काऊट-गाईड यांनी तालबद्ध व लयबद्ध संचलनाने मान्यवरांना मानवंदना दिली.
प्रभातफेरी स्वच्छ भारत अभियानच्या घोषणा देत परिसर दुमदुमन टाकला.ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.या ठिकाणी सरपंच सौ.मंगलताई माने यांचे हस्ते झाले. सीमेवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच यावेळी गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्काऊट मास्टर श्री.विकास जी.लोखंडे यांनी केले.

No comments:
Post a Comment