वर्तमानकाळात दुष्काळ आणि जागतिक तापमान वाढ यांसारख्या मोठ्या समस्या
निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी एकच रामबाण उपाय झाडे
लावणे हा आहे. पण शहरीकरणाच्या धुंदीत आजकाल अनेक झाडांची कत्तल केली जाते.
अशावेळी राजमित्र रा.शा. माने-पाटील विद्यामंदिरमधील स्काऊट-गाईड यांचे
झाडांवरचे प्रेम आपल्याला प्रेरणा देते. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी
पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली आहे. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही
राक्षबंधानाच्या दिवशी झाडांना राखी बांधण्यासाठी राख्या तयार केल्या आहेत.
रक्षाबंधन दिनी वृक्षाबंधन करून वृक्षसंवर्धनासाठी सतत प्रयत्नशील राहणार
आहेत.या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व
उपशिक्षिका सौ.ज्योत्स्ना विकास लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले
No comments:
Post a Comment