विसापुरात माने-पाटील विद्यामंदिरमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा !
विसापूर(६ ऑगस्ट )- परंपरांनी पक्क्या केलेल्या या नात्यांपैकी एक नाते बहीण—भावाचे. बहीण—भावाचे नाते अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हे नाते दृढ व्हावे म्हणूनच दरवर्षी विसापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे,राजमित्र रा.शा. माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) कॉलेजमध्ये मोठ्या आनंदाने साजरा करतात.यावर्षीही सर्व मुलींनी सर्व मुलांना राख्या बांधल्या.त्यावेळी सर्व मुलांनीही आपल्या बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतली.त्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर सेवकवृंद यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेऊन झाडांना राखी बांधून वृक्षाबंधन केले. तसेच सणाचे अवचित्य साधून प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही., हरितसेना प्रमुख पाटील एच.जी. यांनी विद्यालयाच्या परिसरात ४ वटवृक्षाचे वृक्षारोपण केले.छोट्या-छोट्या झाडांनीही मुलींनी राख्या बांधल्या. या कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे व सर्व सेवकवृंद यांनी केले

No comments:
Post a Comment