सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Saturday, 12 August 2017

माने-पाटील विद्यामंदिरचे श्रमदान शिबीर व श्रावणी सहल उत्साहात संपन्न !
विसापूर (११ ऑगस्ट ) - येथील राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिरचे श्रमदान शिबीर व श्रावणी सहल सामाजिक वनीकरण (Forest) विसापूर येथे संपन्न झाले.
सकाळी लवकरच विद्यालयातून निघाले. वनीकरण (Forest)येथे पोहोचल्यानंतर इ.८ वी व ९ वी च्या स्काऊट-गाईड यांनी पावसाचे पडलेले पाणी अडवले जावे यासाठी उतारावर चर-खोदाई केली.पर्यावरणाच्या संवर्धनाचा एक उपाय करण्याचा प्रयत्न या चिमुकल्यांनी केला.सर्वच स्काऊट-गाईड यांनी उत्साहाने श्रमदान शिबीर पार पडले.
त्यानंतर सर्व विद्यार्थी आनंदाने वनीकरणात बागडत पळत होते.त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.मुलीही पारंपारिक खेळात रममाण झाल्या होत्या.
दमल्यानंतर सर्वच विद्यार्थी व शिक्षक जेवण करण्यास बसले व वनभोजनाचा आनंद घेतला. जेवणानंतर विद्यार्थ्यांनी गाणी,कोडी,विनोद,चुटके नाटिका सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमास चांगली साद देत कार्यक्रम पार पडला.
दुपारी सर्व विद्यार्थी विद्यालयात पोहचले.सर्वांच्या चेहऱ्यावर अलोट आनंद दिसून येत होता.या आनंदाला साद म्हणून विद्यार्थ्यांनी घरी जाताना ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेले एक-एक झाड घरी घेऊन गेले व दिलेले झाडाचे रोपण करून संवर्धन करण्याचे ठरविले.या श्रावणी सहल व श्रमदान शिबिराचे नियोजन हरित सेना प्रमुख श्री.पाटील एच.जी. व स्काऊट मास्टर श्री. विकास जी. लोखंडे तसेच सर्व सेवकवृंद यांनी केले.






























No comments:

Post a Comment