माने-पाटील विद्यामंदिरमध्ये स्काऊटस्-गाईडस् यांनी लुटला
फुटबॉल खेळाचा आनंद !!!
विसापूर(दि.१५
सप्टेंबर):येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि)ज्युनिअर
कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी फुटबॉलच्या स्पर्धेत भाग घेऊन खेळाचा मनसोक्त खिलाडूवृत्तीने
आनंद लुटला.
भारताने ‘यु-१७ फीफा विश्वचषक फुटबॉल टूर्लामेंट
इन ऑक्टोंबर २०१७’चे यजमानपद स्विकारले आहे.ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची
गोष्ट आहे.जागतिक फुटबॉल महासंघाची फीफा वर्ल्ड कप स्पर्धा १७ वर्षाखालील मुले या
गटात दि.६ ते २४ ऑक्टोंबर २०१७ दरम्यान होत आहेत.या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने
देशभरात क्रीडा संस्कृती रुजाविण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट मा.पंतप्रधान नरेंद्र
नोदी यांनी जाहीर केला आहे.या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा
देण्यासाठी आणि राज्यातील मुलांमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र मिशन
एक मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयातील
वर्गानुसार विद्यार्थ्यांच्या संघांमध्ये फुटबॉलचे सामने खेळले गेले.इ.५ वी ते इ.
१२ वी अखेर सर्व वर्गासाठी ४ गटात स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या
उद्घाटनासाठी विसापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.एम.एस.काळे साहेब, मा.प्राचार्य
श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व सेवकवृंद उपस्थित होते.
या स्पर्धेचे नियोजन क्रीडाप्रमुख श्री.एस.डी.खाडे
व सर्व क्रीडा शिक्षक- सर्व सेवकवृंद यांनी केले.
No comments:
Post a Comment