सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Sunday, 17 September 2017



मिशन इंद्रधनुष : जिंदगी इंद्रधनुष बनाए !
          आज विसापूरमधील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यालयातील स्काऊट व गाईड यांनी बाळसिद्ध मंदिरच्या सभामंडपात सर्व माता भगिनी पालक-बालक  यांना एकत्रित बोलावले होते. ‘मिशन इंद्रधनुष’ कार्यक्रमांतर्गत  घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ, कावीळ,गोवर या रोगांबद्दल माहिती सांगितली. तसेच आजारांबद्दल स्काऊट यांनी नाटिका सादर केली.या कार्यक्रमाला मंदिराच्या परिसरातील ४०-४५ महिला,बालक उपस्थित होते. या विविध आजाराबद्दल सामाजिक जागृतीसाठी करण्यासाठी स्काऊट-गाईड यांनी छोटासा प्रयत्न सुरु केलेला आहे .यावेळी महिला पालकांनी या उपक्रमाबद्दल स्काऊट-गाईड यांचे कौतुक केले व त्यानुसार आरोग्याकडे लक्षही देऊ, असे सांगून आभार मानले.
          भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे ‘मिशन इंद्रधनुष’ कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिला व २ वर्षाखालील बालकांकारिता ७ रोग प्रतिबंधक लसी देऊन रोगांपासून पूर्णपणे दूर ठेवणे अपेक्षित आहे. स्काऊटस् आणि गाईडस् चे बी प्रीपेअर्ड हे ध्येय लक्षात घेऊन संकटसमयी उपयोगी पडतील अशी कौशल्य, श्रमाचे महत्त्व समजावे,श्रम मूल्याची जाणीव व्हावी, श्रमाची सवय लागावी, स्वावलंबनाद्वारा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी स्काऊटस् व गाईडस् मधील सृजनशीलता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी आजपासून  काम चालू केले आहे.










No comments:

Post a Comment