सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Monday, 4 September 2017

विसापूरच्या स्काऊटस्-गाईडस् यांनी अभ्यासला ग्रामपंचायत कारभार व उपसा सिंचन पंपगृहाची योजना !!!

विसापूर (दि.४ सप्टेंबर) – येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरचे उपक्रमशील शिक्षक श्री.वळवी यु.एल.यांचे मार्गदर्शनाखाली इ.५ वीचे विद्यार्थी क्षेत्रभेटीसाठी विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार कसा चालवला जातो? ग्रामपंचायतमध्ये कोणते अधिकारी असतात? कोणत्या योजना राबविल्या जातात? यांची अतिशय सुंदर माहिती ग्रामविकास अधिकारी मा.श्री.बी.आर.मोहिते साहेब यांनी सांगितली.त्यामुळे स्काऊटस्-गाईडस् विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतचा व्यवस्थित अभ्यासता आला. राष्ट्रीय रोजगार हमी योजनाचे उगमस्थान विसापूर असल्याचे व जनक मा. वि.स.पागे असल्याचे सांगण्यास श्री.मोहिते साहेब विसरले नाही. यावेळी मा.श्री.मोहन कांबळे (ग्रा.सदस्य), मा.श्री.काका माने (सहा.सचिव) व इतर सेवकवृंद उपस्थित होते.यांनी विद्यार्थ्यांना विविध फलक,तक्ते व बोर्डाची माहिती सांगितली.
तसेच इ.१० वीच्या स्काऊटस्-गाईडस् विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे – टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत विसापूर उपसा सिंचन योजना पंपगृह क्र.१ विसापूर येथे भेट दिली.त्याठिकाणी गेल्यावर प्रथम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंपगृह स्वच्छता केली. कशासाठी पंपगृह स्थापन केले आहे ? काम व व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते ? पाण्याचा उपयोग कशासाठी करतात ? व्यवस्थापन कसे केले जाते याची माहिती व संपूर्ण योजनेची माहिती त्याठिकाणचे व्यवस्थापक मा.श्री.दत्तात्रय सोपान पाखरे साहेब(क.लेखनिक), मा.श्री.अक्षय फाटक, मा.श्री.विकास माने यांनी दिली.त्यामुळे योजनेची गरज विद्यार्थ्यांना समजल्याने क्षेत्रभेटीचा हेतू साध्य झाला. या क्षेत्रभेटीचे नियोजन श्री.वळवी यु.एल.यांनी केले. यावेळी स्काऊटस्-गाईडस् विद्यार्थ्यासमवेत स्काऊट मास्टर श्री.विकास जी. लोखंडे उपस्थित होते.






No comments:

Post a Comment