शिक्षक दिनी विसापूरच्या विद्यार्थ्यांनी चालवले शालेय कामकाज !
विसापूर ( ६ सप्टेंबर)- येथील राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान(कृषि) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांबद्दल असलेली आपुलकी व आदरभावना म्हणून १ दिवस शालेय कामकाज पार पडले.विद्यार्थी प्राचार्यांपासून शिपाई मामा पर्यंत सर्व कामे विद्यार्थीच पाहत होती.यामध्ये विद्यालयातील इ.१० वी व १२ वीचे विद्यार्थी सहभागी झालेले होते.मुख्याध्यापक म्हणून प्रतिक प्रभाकर माने व पर्यवेक्षिका म्हणून कु.कोमल राजकुमार मंडले काम पहिले.
सकाळीची प्रार्थना घेण्यापासून ते वेळेवर वर्गावर अध्यापनासाठी जाणे, विद्यार्थ्यांची हजेरी घेणे, वेळेवर घंटा वाजविणे, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे,शालेय पोषण आहाराचे वाटप करणे, ग्रंथालयातील पुस्तकांची देवाण-घेवाण करणे,इ.सर्व कामे आज विद्यार्थ्यांनीच केली. त्यामुळे दैनंदिन कामकाजापेक्षा आजचा दिवस वेगळा असल्याने सर्व विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
अध्यापन करताना विद्यार्थी-शिक्षकांना अनुभवास आलेल्या गमती जमती विद्यार्थ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाल्या. यावेळी सर्व विद्यार्थी-शिक्षक यांनी सर्व गुरुवर्यांना गुलाबपुष्प,पेन व श्रीफळ देऊन गुरुवंदना केली.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे दिवसभर आनंदाचे वातावरण होते.विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभवला.या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील १० वीचे वर्गशिक्षक श्री.खोत सी.डी. व श्री.पाटील एच.जी.यांनी केले.

No comments:
Post a Comment