सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Tuesday, 26 September 2017

विसापुरात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात साजरा !
विसापूर (दि.२५ सप्टे ).: “शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर शिक्षणात कोणतीही अडचण निर्माण होत नाही.अभ्यासाची धार कमी होता कामा नये. शाळांनाही लोकसहभागातून जास्तीत जास्त मदत गावकऱ्यांनी केली पाहिजे,”असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.अभिजित राऊत यांनी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरमध्ये जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी दै.सकाळ, सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक मा.श्री.शेखर जोशी होते.त्यांनी आपल्या मनोगतातून “अभ्यासाठी नवनवीन विज्ञान व तंत्राचा वापर करावयास हवा, आपणास रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवीन क्षेत्र निवडला हवे,असे त्यांनी आपल्या मनोगातून व्यक्त केले.यावेळी जि.प.सदस्य श्री.अर्जुन(बापू) पाटील,सरपंच सौ.मंगलताई माने,उपसरपंच श्री.गुरुलिंग माळी,श्री.पतंग(बापू)माने, श्री.संपत माने, श्री.बळवंत(तात्या)चव्हाण, डी.ए.माने सर, भगवान माने सर, श्री.प्रल्हाद माने,पांडुरंग शिवणकर,श्री.भिमराव शिवणकर,श्री.सुतार सर, श्री.शरद डबे सर,आंबी सर,भास्कर माने सर,सुबराव पाटील,शहाजी माने,महिंद सर,जयपाल बिरनाळे, परिसरातील मुख्याध्यापक,आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या प्रगतीचा अहवाल विद्यालयाचे प्राचार्य श्री.एम.व्ही.चिवटे यांनी मांडला. बक्षीस वितरणाचे नियोजन श्री.सी.डी.खोत तर कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार श्री.एल.वाय.चव्हाण यांनी मांडले.सूत्रसंचालन श्री.विकास लोखंडे यांनी केले.













No comments:

Post a Comment