सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Monday, 2 October 2017



विसापूर पंचक्रोशीत ग्रामस्वच्छताने  साजरी केली गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती !
विसापूर (२ ऑक्टोंबर २०१७): येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान(कृषि)ज्युनिअर कॉलेजमधील ५२० स्काऊट-गाईड  यांनी विसापूर, हातनोली, हातनूर, शिरगाव,जिरवळ मळा व पंचक्रोशीमध्ये श्रमदानातून ग्रामस्वच्छता केली व गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली.
        कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्मीय प्रार्थनेने झाली. गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदीपकुमार कुडाळकर साहेब यांनी दीपप्रज्वलन करून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन केले.स्काऊट-गाईड वचनाचे पालन करून आपण आपले घर,आपले गाव ते आपला देश कसा स्वच्छ राहील यासाठी सदैव तयार राहिले पहिजे, असे प्रतिपादन मा.कुडाळकर साहेब यांनी आपले मनोगतातून व्यक्त केले व त्यांनी हातात झाडू घेऊन शालेय परिसर स्वच्छ करून ग्रामस्वच्छतेला सुरुवात केली.
        स्काऊट-गाईड यांनी प्रभातफेरी काढून स्वच्छतेच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. नंतर ग्रामपंचायत कार्यालयापासून ते शाळेपर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.चावडी,मंदिरे, रस्ते,चौक,पडकी-मोकळी जागा गटारे स्वच्छ केली. या स्वच्छतेमध्ये जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुन (बापू) पाटील व सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन स्काऊट-गाईड यांचे कौतुक केले.कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतची घंटागाडी विद्यार्थ्यासमवेत होती.
        या कार्यक्रमाचे नियोजन श्री.विकास जी.लोखंडे,सौ.ज्योत्स्ना लोखंडे, श्री.जगदाळे जी.एस.,कु.पाटील एम.व्ही.कु.चव्हाण,श्री.धोंडीराम मंडले, श्री.सतिश मंडले व सर्व सेवकवृंद यांनी केले.
















































No comments:

Post a Comment